Skip to main content

Posts

Showing posts from April, 2026

सावधान! 'सुपर एल​ निनो' येतोय: काय असेल भारतावर आणि जगावर याचा परिणाम?

  सावधान! 'सुपर एल​ निनो' येतोय: काय असेल भारतावर आणि जगावर याचा परिणाम? निसर्गाची चक्रे सतत फिरत असतात, पण काहीवेळा ही चक्रे इतकी शक्तिशाली होतात की संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था आणि हवामान विस्कळीत करण्याची क्षमता ठेवतात. सध्या हवामान शास्त्रज्ञांच्या चर्चेत असलेला सर्वात मोठा विषय म्हणजे 'सुपर अल निनो' (SUPER El Niño). साधारण अल निनो आपण अनुभवला आहे, पण जेव्हा याच्या तीव्रतेचा टप्पा ओलांडला जातो, तेव्हा त्याला 'सुपर अल निनो' म्हटले जाते. हा ब्लॉग वाचून तुम्हाला समजेल की हा नेमका प्रकार काय आहे आणि आपल्याला याची काळजी का करावी लागेल. १. अल निनो (El Niño) म्हणजे काय? प्रशांत महासागराच्या (Pacific Ocean) पृष्ठभागाचे तापमान जेव्हा सामान्यपेक्षा जास्त वाढते, तेव्हा त्या स्थितीला 'अल निनो' म्हणतात. याचा थेट परिणाम जागतिक वाऱ्यांच्या प्रवाहावर होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, समुद्रातील ही उष्णता ढगांच्या प्रवासाची दिशा बदलते, ज्यामुळे कुठे अतिवृष्टी होते तर कुठे भीषण दुष्काळ पडतो. २. याला 'सुपर' का म्हटले जात आहे? जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान स...

सास्तूरवर शैक्षणिक अन्याय का?

  सास्तूरवर शैक्षणिक अन्याय का? माकणीला एक न्याय आणि आम्हाला दुसरा का? शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, असे आपण म्हणतो. पण जेव्हा ग्रामीण भागातील, विशेषतः सास्तूरसारख्या मोठ्या गावातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न येतो, तेव्हा प्रशासकीय नियम आणि राजकीय इच्छाशक्ती यांच्यात मोठी दरी पाहायला मिळते. आज सास्तूरची लोकसंख्या आणि विस्तार पाहता, गावात ११ वी आणि १२ वीचे स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय असणे ही काळाची गरज आहे. मात्र, वर्षानुवर्षे आमचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी वणवण भटकत आहेत. नियम की फक्त निवडीचा बहाणा? जेव्हा सास्तूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालय आणण्याची मागणी होते, तेव्हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकच उत्तर देतात – "५ किलोमीटरच्या आत दुसरे महाविद्यालय देता येत नाही." तांत्रिकदृष्ट्या हा नियम असेलही, पण मग आमचा सवाल असा आहे की: शेजारच्या माकणी गावात अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर दोन-दोन महाविद्यालये कशी काय असू शकतात? जर माकणीमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नियम शिथिल होऊ शकतात, तर सास्तूरच्या लेकरांनी काय पाप केले आहे? सास्तूरच्या मुलींना उच्च शिक्षणासाठी द...

JEE | CET | NIT तयारी सास्तूर मध्ये 🤔

 🎯 JEE | CET | NIT तयारीसाठी शहरी का जावं? 🤔 आजही अनेक पालक आपल्या मुला-मुलींना 🏙️ लातूर सारख्या शहरात 1-2 महिन्यांसाठी पाठवतात... 💸 क्लास फी: ₹7,000 ते ₹1,00,000 🍽️ राहणे + खाणे + प्रवास = अजून खर्च! 😟 आणि तरीही Result ची खात्री नाही... 👉 पण आता काळ बदललाय! 📍 JIYA COMPUTER EDUCATION, SASTUR मध्ये 🤖 AI आधारित 24×7 Practice System सुरू! 💡 खास काय? ✔️ प्रत्येक विषय आता AI द्वारे शिकवला जातो (ChatGPT, Gemini, DeepSeek सारख्या Technology चा वापर) ✔️ 24×7 Practice – कधीही अभ्यास ✔️ Instant Doubt Solving ✔️ Smart Test + Analysis ✔️ Weak Topics वर Direct Focus 👨‍🎓 आता तुमचं मूल गावात राहूनही शहरासारखीच नाही, तर त्याहून SMART तयारी करू शकतं! 🔥 कमी खर्च + जास्त Result = Smart Decision 👉 आजच Admission घ्या! 🚀 AI च्या मदतीने JEE, CET आणि NIT तयारी – आता SASTUR मध्येच! आजच्या स्पर्धेच्या युगात JEE , MHT-CET आणि National Institutes of Technology मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी फक्त Hard Work पुरेसं नाही, तर Smart Work खूप महत्त्वाचं आहे. आज अनेक पालक आपल्या मुलांना Latur सारख्य...

इंग्रजीचा बाप तुमच्या घरात​

  🔹 1. रोजचा 1 तासाचा routine ( सगळ्यात important) 👉 रोज 3 भागात divide करा: (1) 20 मिनिट – Listening ( ऐकणे) YouTube वर Kids English stories / cartoons उदाहरण: YouTube वर “ English story for kids” ऐकताना subtitles ON ठेवा (2) 20 मिनिट – Speaking ( बोलणे) घरातच simple sentences बोलायला लावा: I am eating I am going to school mirror समोर बोलायला सांगा (3) 20 मिनिट – Reading + Writing लहान story book वाचणे 5 sentences लिहिणे ( daily diary) 🔹 2. Best FREE Apps ( घरीच शिकण्यासाठी) हे apps मुलांसाठी खूप effective आहेत: Duolingo 👉 game सारखं शिकवतो ( fun + easy) Hello English 👉 Hindi/Marathi मधून English शिकवतो BBC Learning English 👉 pronunciation + grammar strong करतो 🔹 3. Golden Rule ( सगळ्यात मोठा secret) 👉 Grammar आधी नाही — बोलणे आधी! जास्त grammar शिकवलं तर मुलं घाबरतात 👉 आधी बोलायल...

हार्ट ऑपरेशन नंतरची काळजी आणि शुगर कंट्रोल – प्रत्येकाने वाचायलाच हवा!

 ❤️ हार्ट ऑपरेशन नंतरची काळजी आणि शुगर कंट्रोल – प्रत्येकाने वाचायलाच हवा! आजकाल बऱ्याच लोकांना हार्टचं ऑपरेशन (bypass surgery) करावं लागतं. पण ऑपरेशन झाल्यावर खरी काळजी सुरू होते. योग्य lifestyle नसेल तर पुन्हा त्रास होऊ शकतो. 👉 १. औषधं वेळेवर घ्या डॉक्टरांनी दिलेली blood thinner आणि BP control ची औषधं कधीही स्वतःहून बंद करू नका. 👉 २. शुगर कंट्रोल खूप महत्वाचं जर HbA1c जास्त (7% पेक्षा वर) असेल तर धोका वाढतो. गोड पदार्थ, साखर, मैदा शक्यतो टाळा. 👉 ३. योग्य आहार घ्या ज्वारी/बाजरी भाकरी हिरव्या भाज्या 🥦 फळं (मर्यादेत) तेलकट, तळलेलं कमी करा 👉 ४. रोज चालणं (Walking) रोज किमान 30 मिनिट चालणं हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. 👉 ५. तणाव टाळा तणावामुळे BP आणि शुगर दोन्ही वाढतात. शांत राहण्याचा प्रयत्न करा. 👉 ६. नियमित तपासणी करा शुगर check BP check डॉक्टर follow-up 👉 महत्त्वाचं: ऑपरेशन म्हणजे इलाज संपला नाही — lifestyle बदलला तरच खरं आरोग्य मिळतं. 🙏 आपल्या घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घ्या. आरोग्य हेच खरं धन आहे. #Health #HeartCare #Diabetes #HealthyLife

एकच ईश्वर​

  👆 माझ्या सर्व वर्ग मित्रांना माझ्या जिवनातील सर्वात प्रिय​, सर्वात मोठा जो माझा ध्येय आहे, जी माझी तळमळ आहे त्याचा सार मी वरील गोष्टीत आपल्यास देत आहे. या व्यतीरिक्त मी काही करु शकत नाही. ही माझी सर्वात मोठी जबाबदारी होती जी मला वाटते आज पुर्ण झाली आहे. ज्यामुळे मित्रानो माझे मन इतके म्हणजे एकदम हलके झाले असे मला वाटत आहे. मित्रानो या ब्लॉगमध्ये आणखी अशा काही लिंक्स आहेत ज्यात स्पष्ठपणे उल्लेख केला आहे. ज्याची आतुरतेने अख्या जगातील निवडक व्यक्ती वाट पाहत आहेत. तेही तुम्ही वाचुन पुढे काय असे प्रश्न पडत असेल​. मी नक्कीच सांगतो एक दिवस असा येईल की, काही जण पश्चाताप करतील तर काही चेहरे खिळलेली असतील​. हा ब्लॉग बनविन्या मागे माझे कारण बसल्या बसल्या पैशे कमविणे होते पण​. धिक्कार त्या गोष्टीवर, त्या विचारावर इतकी अनमोल गोष्ठ कस विकणार. खरचं हे विकण्यासाठी नाही तर वाटण्यासाठी आहे. म्हणुन या त्या गोष्टीकडे जी तुमच्यात आणि आमच्यात समान आहे. आज जर एखादा व्यक्तीने दावा केला की तो रामाला भेटला आहे तर काय होईल​? लोकं त्याची खिल्ली उडवल्या शिवाय राहणार नाहीत​. बरोबर​? पण जर तुमच्या मित्रानेच ह...