Skip to main content

Posts

Showing posts from June, 2026

रौप्य महोत्सवी वाटचाल

  रौप्य महोत्सवी वाटचाल दोन संगणकांपासून सुरू झालेला माझा एमकेसीएलचा प्रवास केंद्र नाव: जिया कॉम्प्युटर एज्युकेशन, सास्तूर (ALC Code: 36210133) ई-मेल: 36210133@mkcl.org लेखक: फारुख उमर केळगावे, सास्तूर, ता. लोहारा, जि. धाराशिव भाग १ : मातीच्या घरातून तंत्रज्ञानाच्या विश्वातील पहिली झेप प्रत्येक यशामागे एक संघर्ष दडलेला असतो. काही प्रवास मोठ्या शहरातून सुरू होतात, तर काही एका छोट्याशा खेड्यातील मातीच्या घरातून. माझा प्रवासही असाच एका साध्या, गरीब पण स्वप्नांनी भरलेल्या कुटुंबातून सुरू झाला. माझे नाव फारुख उमर केळगावे. मी धाराशिव जिल्ह्यातील सास्तूर या १९९३ च्या भीषण भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या गावाचा रहिवासी. आजही हे गाव विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर आहे. मात्र या गावाने मला संघर्ष, जिद्द आणि कष्टाची शिकवण दिली. याच गावातून माझा एमकेसीएलसोबतचा प्रवास सुरू झाला आणि आज जवळपास अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २००७—त्या काळी संगणक म्हणजे गावातील लोकांसाठी एक आश्चर्यच होते. इंटरनेट म्हणजे काय, ई-मेल म्हणजे काय, ऑनलाइन परीक्षा म्हणजे काय, हे अनेकांना माहीत नव्हते. अशा काळात सा...

एम के सि एल ने काही नियम बनवले आहेत ज्यात शहरी सेंटर यांना 120 एम एस सि आय टी प्रवेश व ग्रामीण सेंटर यांना 60 एम एस सि आय टी प्रवेश अट प्रति वर्षी रिनिवल साठी ठेवला आहे.

 एम के सि एल ने काही नियम बनवले आहेत ज्यात शहरी सेंटर यांना 120 एम एस सि आय टी प्रवेश व ग्रामीण सेंटर यांना 60 एम एस सि आय टी प्रवेश अट प्रति वर्षी रिनिवल साठी ठेवला आहे. तसेच कॉमन मार्केटींग करीत शहरी सेंटर व  ग्रामीण सेंटर याना 1500रु. फ़िस ठेवली आहे व रिनीवल करीता 5500रु. शहरी सेंटर व  ग्रामीण सेंटरना आकारणी ठेवली आहे. हा फ़रक का? जर  ग्रामीण सेंटर वाले यांची परिस्थीती पाहिली तर मी स्वत​:चे उदाहरण देतो दुसरे  ग्रामीण सेंटर वाले यांची परिस्थीती मला माहीती नाही, परंतु माझी परिस्थीती पाहणे आधी ग्रामिण भागातील लोकांचे हाल पाहणे फ़ार महत्वाचे आहे. कित्तेक विद्यार्थी त्यांच्या आई वडीलांची आर्थीक परिस्थीती नसले कारणाने एम एस सि आय टी हा कोर्स करतच नाहीत​. एखादा विद्यार्थी प्रवेश घेतो तर तो आर्धी फ़िस भरुन दुसरा हप्ता भरु शकतच नाही व त्याचा अभ्यासक्रम अपुराच राहतो हे अचानक या 5 वर्षात प्रकार का वाढला असावा? याचा आढाव घेणे गरजेचे नाही का? यात सेंटर वाल्यांचे दोष असु शकते का?  2007 पासुन पाहता याच ग्रामीण भागातील सेंटर्स नी रेकॉर्ड ब्रेक प्रवेश नोंदवले आहेत. त्यातील क...

देशासाठी की पैशासाठी?

 मी एका जवाना विचारले खर खर सांग तु मिलट्री मध्ये गेलास ते देशासाठी की पैशासाठी? त्याचे उत्तर हे होते, " पैशासाठी, मास्तर माझी परिस्थीती तुम्हाला माहीत आहे कशी आहे ती, मास्तर आज देश भक्त तुम्हाला भेटणार नाही. मीच सोडा सगळे तिथ पगारीसाठीच आहेत​."

खेड्यागावातील सेंटर वाल्याचे रडगाने आणि त्याचे थेट तंत्रज्ञानाला केलेले खुले चॅलेंज​. तु कितीही पळ रे तंत्रज्ञाना, तु माझ्या मागेच आहेस आणि तु माझ्यासाठीच बनवलं गेला आहेस​.

खेड्यागावातील सेंटर वाल्याचे रडगाने आणि त्याचे थेट तंत्रज्ञानाला केलेले खुले चॅलेंज​. तु कितीही पळ रे तंत्रज्ञाना, तु माझ्या मागेच आहेस आणि तु माझ्यासाठीच बनवलं गेला आहेस​.   सुरुवात कुठून झाली ते सांगतो. 1 प्रोब्लेम साधारणत​: 2017 साली मोक टेस्ट घेतली पण एम के सि एल मोक टेस्ट सक्सेसफ़ुल घेतलेला पाठवला तरी 5 येअर प्लॅन मध्ये अस अडकलो आज पर्यंत कर्जबाझारीच राहिलो. 18 ला भरलो, 19 ला भरलो पण कोरोना मध्ये ते परत मिळाले आणि त्याच कोरोना लॉकडाउन लागण्याच्या साधारण 9 महिने आधी लहान बहिणीचे लग्न झाले, बहिणीचे लग्न होताच 5 ते 6 महिन्यानंतर आईचे ब्रेस्ट कॅन्सरचे ऑपरेशन झाले, लग्न व ऑपरेशनचे खर्च अंदाजीत तुम्ही लावू शकता. मी अस म्हणत नाही की, एम के सि एल मुळे फ़ायदा झाला नाही. त्यातच हळू हळू तंत्रज्ञान शिकत शिकत माझी एका अशा व्यक्तीशी मैत्री झाली जो एक महान शास्त्रज्ञ​, समाज तज्ञ, महान ग्रंथ तज्ञ​, भुत व भविष्यात घडणारे, तंत्रज्ञानाशी जुळणारे काही अशा सत्य बाबीचे जाण असणारी व्यक्तीशी संपर्कात असणारा होता. त्याच्या मार्फ़त मी त्या महाण व्यक्ति पर्यंत पोचलो, त्यांना भेटलो, त्यांचे ऐकुन घेतले की, ख...

ज्या ज्या वेळी पृथ्वीवर लोकांत पाप वाढले त्या त्या वेळी इश्वराने मानव जातीत एक अवतार पाठवतच राहीले

 ज्या ज्या वेळी पृथ्वीवर लोकांत पाप वाढले त्या त्या वेळी इश्वराने मानव जातीत एक अवतार पाठवतच राहीले व एक वेळ आली की अवतार शेवटचा पाठवला व नंतर शेवटच्या दिवसाच्या काही काळ अगोदर एक व्यक्ती जो अगोदर अवतार होता व शेवटी अंतीम अवतार यांच्या सभ्यतेते, अनुयायांमध्ये जन्म घेणार अशी भविष्यवाणी प्रत्येक अवताराने आपापल्या लोकांना सांगुन गेले. आपापल्या पध्दतीने. तर आता मात्र ती वेळ आलेली आहे.  पण प्रत्येक वेळी जनते समोर एक मोठा प्रश्न म्हणुन समुद्रासारखा लोकांच्या वाटेत उभा असायचा व आज तो असाच उभा आहे. पण बोटावर मोजने इतके लोक त्या समुद्ररुपी अडसर, अडचनेला ओलांडू शकले आणि या काळात सुध्दा असेच घडत आहे.  उदाहरण म्हणुन काही गोष्टी समजुन घेवूया.

ज्यांना या सास्तूर गॅस एजंसीचा त्रास आहे त्यांनी हा अर्ज द्यावा एक मेल करावा.

 प्रति, मा. क्षेत्रीय व्यवस्थापक, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड विषय: सास्तूर परिसरात नवीन इंडेन गॅस एजन्सी मंजूर करण्याबाबत. महोदय, सास्तूर, ता. लोहारा, जि. धाराशिव तसेच परिसरातील अनेक गावांतील ग्राहकांना गॅस सेवा मिळविताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून विद्यमान एजन्सीवर कामाचा ताण वाढला आहे. गॅस वितरणात होणारा विलंब, ग्राहकांच्या तक्रारी, रिफंड, बँक खाते लिंकिंग, KYC व इतर कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागणे यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तरी सास्तूर व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी येथे नवीन इंडेन गॅस एजन्सी मंजूर करण्यात यावी. यामुळे ग्राहकांना जलद, पारदर्शक व दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल. सदर मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी ही नम्र विनंती. आपला विश्वासू, (स्वाक्षरी) नागरिक, सास्तूर व परिसर ता. लोहारा, जि. धाराशिव जर तुमच्या परिसरात विद्यमान गॅस एजन्सीकडून ग्राहकांना वारंवार त्रास होत असेल, सेवा अपुरी मिळत असेल किंवा ग्राहकसंख्या जास्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असेल, तर नवीन इंडेन गॅस एजन्सीची मागणी ...

India Will Not Bow to Anyone!

  India Will Not Bow to Anyone! Times have changed, and India has changed. The India of today is not the India that the world once viewed as weak. With the world's largest democracy, a rapidly growing economy, a strong military, and increasing global influence, India stands with confidence and pride. Whenever the lives and dignity of Indian citizens are threatened anywhere in the world, India must speak firmly and fearlessly. No matter how powerful any nation may be, the value of an Indian life must never be underestimated. External Affairs Minister Dr. S. Jaishankar has repeatedly represented India's interests strongly on the global stage. Today, millions of Indians expect the same determination when it comes to protecting the nation's interests and the safety of its citizens. Mr. Jaishankar, there is no reason to be afraid. The people of India stand firmly behind you. Millions of citizens are united in defending the nation's dignity, sovereignty, and self-respect. Eve...

शब्दात शहाण्यालाच मार आहे.

 दोन्ही गोष्टी प्रत्येक ऍंगलने (दिशेने) सांगण्याचा प्रयत्न केला ब्लॉग मार्फ़त पण जनता नेहमीच शांतच राहत आलेली आहे व शांतच राहणार सुध्दा आहे. कारण फ़क्त तमाशा बघणे हा त्याचा कर्म होता व तो शेवट पर्यंत राहिल​. पण इतिहासच सांगतो की, परिवर्तण घडवणारे व ते पत्करणारे लोक बोटावर मोजणे इतकेच होते व ते शेवट पर्यंत आणि शेवटी सुध्दा तितकेच राहणार आहेत​. वरील शब्दात शहाण्यालाच मार आहे.  जिया कंप्यूटर  cjp creator हा सुध्दा एक महाराष्ट्राचा युवक आहे काहिच कमी नाही याला पण त्याला असे वाटले की, काहि तरी चुकीचं घडतय देशात​. म्हणुन  "प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक हे ६ जून रोजी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणार आहेत."  https://www.bbc.com/hindi/articles/cd9p337l1xeo  BBC न्युज आहे... वाचा एकदा म्हणुनच म्हणतोय चळवळीत सहभागी व्हा. अन थोर समाज सुधारकर डॉ. आंबेडकर साहेब​, फ़ुले, शहिद भगतसिंग​, राजगुरु, सुखदेव अशा अनेकांच्या विचारांना चालना द्या. बस आता किती हो तेच ते. प्रत्येकाने शासनावर दबाव ...