Skip to main content

खेड्यागावातील सेंटर वाल्याचे रडगाने आणि त्याचे थेट तंत्रज्ञानाला केलेले खुले चॅलेंज​. तु कितीही पळ रे तंत्रज्ञाना, तु माझ्या मागेच आहेस आणि तु माझ्यासाठीच बनवलं गेला आहेस​.

खेड्यागावातील सेंटर वाल्याचे रडगाने आणि त्याचे थेट तंत्रज्ञानाला केलेले खुले चॅलेंज​. तु कितीही पळ रे तंत्रज्ञाना, तु माझ्या मागेच आहेस आणि तु माझ्यासाठीच बनवलं गेला आहेस​. 


सुरुवात कुठून झाली ते सांगतो. 1 प्रोब्लेम साधारणत​: 2017 साली मोक टेस्ट घेतली पण एम के सि एल मोक टेस्ट सक्सेसफ़ुल घेतलेला पाठवला तरी 5 येअर प्लॅन मध्ये अस अडकलो आज पर्यंत कर्जबाझारीच राहिलो. 18 ला भरलो, 19 ला भरलो पण कोरोना मध्ये ते परत मिळाले आणि त्याच कोरोना लॉकडाउन लागण्याच्या साधारण 9 महिने आधी लहान बहिणीचे लग्न झाले, बहिणीचे लग्न होताच 5 ते 6 महिन्यानंतर आईचे ब्रेस्ट कॅन्सरचे ऑपरेशन झाले, लग्न व ऑपरेशनचे खर्च अंदाजीत तुम्ही लावू शकता. मी अस म्हणत नाही की, एम के सि एल मुळे फ़ायदा झाला नाही. त्यातच हळू हळू तंत्रज्ञान शिकत शिकत माझी एका अशा व्यक्तीशी मैत्री झाली जो एक महान शास्त्रज्ञ​, समाज तज्ञ, महान ग्रंथ तज्ञ​, भुत व भविष्यात घडणारे, तंत्रज्ञानाशी जुळणारे काही अशा सत्य बाबीचे जाण असणारी व्यक्तीशी संपर्कात असणारा होता. त्याच्या मार्फ़त मी त्या महाण व्यक्ति पर्यंत पोचलो, त्यांना भेटलो, त्यांचे ऐकुन घेतले की, खरच अविश्वसनिय ज्ञान त्यांच्या जवळ होते. त्याच कारणाने आज ज्या जगात मोठ मोठ्या घडामोडी होतात ते त्याचे परिणाम​, कारण एकदम असे समजावून सांगतात जसे ते त्या प्रत्येक विषयावर जणू पि एच डी केली असावी. पण ही गोष्ट मी सांगणार तरी कोणाला? माझे विश्वास तरी ठेवेल कोण​? म्हणून मी सुरुवात माझ्या घरापासूनच केली. नातेवाईक, मीत्र परिवार​, समाज इ. 

याचा निष्कर्ष असा आला की माझे परिवार तर या गोष्टीवर पुर्णपणे माझ्या सोबत होते, कारण ते शिकलेले होते अडाणी नव्हते, इथपर्यंत माझे आई-वडीलसुध्दा या गोष्टींवर माझ्या सोबत विश्वासात आले. 7 ते 8 मित्रांनी सुध्दा त्या महान व्यक्तीशी भेट घेतली. पण म्हणतात ना की, सत्य ज्या ज्यावेळी लोकांच्या समोर आले त्याला पचन करणे हे किंचीतांनाच जमले बाकी सर्व त्याला विषच समजून त्या सत्याचा तिरस्कार केला आहे. हा इतिहास आहे.  माझी गोष्ट इतकी सोपी नाही जे लगेच समजण्यायोग्य असेल​. हा एक गंभीर ही तितकाच आहे, आश्चर्यजनक ही तितकाच आहे व इंटरेस्टींग सुध्दा तितकाच आहे. हा मुद्दा मी एम के सि एल वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. जो फ़क्त शॉर्ट मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये मी मुद्दामच काही वाक्य टाकले आहेत की माणुस 60 वर्ष जिवण जगण्याकरीता किती धावपळ करतो, प्लॅन बनवतो, नाना प्रकारचे इन्श्युरंस काढतो, विमे काढतो. पण काही गोष्टीपासून तो वंचितच आहे. काहि लोक ते समजतात परंतु 95 ते 99%, म्हणजे थोडक्यात अख्खे जगच एकाच दिशेने नदिच्या प्रवाहासारखे धावत आहे त्या कारणाने उरलेले सुध्दा काही लोकं त्याच प्रवाहात जातात​. परंतु मग होणार तरी काय पुढे.  एम के सि एल चे नाव लौकीक करणार हे वचन दिले आहे.  माफ़ करा हा विषय ब्लॉगमध्ये आहे. 

पुढे माझ्या सोबत जे घडले ते फ़क्त मुस्लिम समाजाने काहि विरोध केला होता. इतर सर्व समाज तर आजही कौतुकच करतात​. कारण पैश्या पेक्षा मानवतेला जपणे, समता, बंधुता या तत्वावर लहानपाणासुन चे शिक्षण​. 

जाउदे आपल्याला काय करायचे आहे असे म्हणणारे समाजात भरपुर आहेत पण. आपण त्या पैकी नाही हा आपल्या मनाला आपणच​ सांगुन चलत राहण्याचा आनंदच वेगळा असतो.

असो. नंतर आजोबाच्या नावे शेती कर्ज काढले होते जे साधाण 99000रु. होते. तेही आज पर्यंत माफ़ झालेच नाही, आज पर्यंत 50 हजार व्याजच भरलो आहे. 

त्या नंतर माझी मोठी बहिण 3 आपत्त्यासहीत घरी येवून बसली ते ही साधारन 2019 मध्येच घडले होते. भावाच लग्न मोडले गेले. पण लोकं अशी असतात एखाद्या घटनेला कुठेही जोडून अफ़वा पसरवने ही जुनी रुढी परंपराच​.

दुसरा लग्न 2024 मध्ये झाले. त्याची मंडळी बिहारची आहे.

2024 ते 25 हा काळ माझा स्वत​:चा मुलगा व वडिल यांच्यासाठी सुध्दा एक वेदनादायीच ठरला. मुलाचे डोळ्याचे ऑपरेशन झाले, 2025 मध्ये वडिलांना हृदय विकाराचे झटके आले. उमरगा, सोलापूर व शेवटी कसबा पेठ शनिवारवाडा पुणे येथे शस्त्रक्रिया झाली त्यावेळी महाराष्ट्रात जोरदार पाउस झाले होते. ज्यावेळी एम के सि एल पावसामुळे झालेले नुकसान सेंटर वाल्यांचे डेटा कलेक्ट करत होते त्या वेळी मी व माझा भाउ पुणे येथेच होतो. माझे सुध्दा तीन लॅपटॉप पाउस गळती मुळे खराब झाले होते. पण मला हे सांगण्यासाठी लाजच वाटली. माझ मनाने या गोष्टीला विरोध केला म्हणुन मी ही गोष्ट सांगितलीच नाही व तारीख सुध्दा निघुनच गेली. या सर्व गोष्टी माझ्या सोबत घडत होते तर दुसरीकडे वेगळाच प्रकार समोर आला. मी कधीच अशी तक्रार न करणारा शेवटी तक्रार द्यावी लागली की, शेजारचे सेंटर वाले फ़िस कमी करुन ऍडमिशन पळवत होते पण त्याला सुध्दा फ़ार उशिर म्हणजे हा प्रकार साधारण 3 ते 4 वर्षापासुन चलत होता, तक्रार केली तर पुरावे मागितले. स्वत​: पालकानेच सांगितले जे घडत आहे ते. व पुरावे ही दिले. एम के सि एल ला. परिणाम काहीच निष्कर्ष निघाले नाही. सरांनी सांगितले सेंटर हालव इथुन दुसरीकडे 2014 पासुन हळु हळु याची तयारीतच होतो. विटा थोड्या आणायच्या मग सळाया (स्टील​) , खडी असे करुन करुन नेंटल लेवल पर्यंत आले होते काम. शेवटी 2023 ते 2024 दरम्यान फ़क्त 1 ते दिड महीना माझा लहान भाऊ विहीरीचे कामे घ्यायचा व त्याने जामखेड येथील 245 एल आर मशीन मालकाने जो सादिक (माझ्या लहान भावाचा ) मित्र होता पाठवले फ़क्त दिड महिन्यात त्याने 3 ते 4 लाख कमवले होते. त्यातच स्लॅब चे काम पुर्ण झाले. आणि या वर्षी अजुन गिलावा सुध्दा झालेला नव्हता सेंटर शिफ़्ट केले गेले. पर्यायच नव्हते.  जो सेंटर 2019 मध्ये 120 च्या जवळ ऍडमिशन करायचे तो अचानक खाली का घसरत गेले. 2022 ला सेंटर काहीच मार्केटींग न करता बसल्या बसल्या, 75 ते 80 ऍडमिशन झाले होते. याचा अर्थ एक या भागातिल लोकांची मानसिकताच बनलेली होती. जिया कंप्यूटर मध्ये कुणीही असो चांगलच शिकवतात​. पण चक्क फ़िस कमी करुन शिकवत नाहीत​, परिक्षा होत नाहीत, आमच्याकडे एसी आहे, सोलर आहे आमुक तमुक म्हणुन प्रचार केला गेला. 120 वरुन 75 आता चक्क 40 पुर्ण वर्षभर हे आश्चर्यकारक वाटत नाही का? 

क्लिकचे ऍडमिशन करा म्हणतात पण​; 1 हजार रु. ते 1500 रु. मध्ये उमरग्यात ऍडमिशन होत असल्यास विद्यार्थी आमच्याकडे का करेल ? बस पास काढुन, मौज मजा करुन 5000 मध्ये सगळेच कोर्स पुर्ण होते. 

वरीष्ठांचा काहीच दोष नसू शकतो परंतु काहीतरी चुकीचं घडत आहे अस भान सुध्दा आपल्याला होत असेल​. तरी सांगणार कोण? होणार कुणाची हिम्मत​?

सर म्हणतात इतका मोठा गाव आहे पण या गावात साध कॉलेज सुध्दा नाही. एका व्यक्तीने 2 वर्ष कॉलेज चलवले पण शेवट ते बंद पडले. आपण पाहू शकता बलसुर​, माकणी, जेवळी येथे वरीष्ठ कनिष्ठ विद्यालये असताना मी अशा सेंटर वाल्यांना ऍडमिशन मध्ये टक्कर दिलो आहे. माझ्या गावात फ़क्त 10 वी पर्यंतच शाळा आहे. कॉलेज साठी साठी मी केलेला प्रयत्न तुम्ही मला न विचारता ग्रामपंचायत, शाळा, व गावातील व्हाटस ऍप ग्रुप ऍडमिन शी चौकशी करु शकता. अथवा मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र​, जिल्हाधीकारी धाराशिव यांची भेट घेवून विचारु शकता. तर शेवटी अपयश​. का ? कारण आज फ़क्त सर्व पैशाकरीता चालू आहे खेळ​, न्याय व लोक, जन, विद्यार्थ्यांच्या हीताचा विचार करण्यास नाही कुणाकडेच वेळ​.

असो. आता कसलिच तक्रार कुणाशी नाही. 

लढा मात्र स्वत​:शी आहे.

सर कितीही संकट येवू द्या त्या देवावर विश्वास ठेवून सांगतो जो सर्वांचा कर्ता धर्ता आहे. मागे हटणार नाही व झुकणार ही नाही.

मी फ़क्त प्रामाणीकच वागण्याचा प्रयत्न करतच आहे आणि राहिणच​. 

इच्छा होती की ओपन चॅलेंज ठेवावे सर्व सेंटर वाले मिळून व टेक्नॉलोजी (तंत्रज्ञानावर​) वर प्रश्न उत्तर सेशन ठेवावे.


विचारावे तरी सर्वांना प्रश्न की, का अमेरीका पुढे पळत आहे?

का त्याने फ़्रांस ला किती तरी टन मॅग्नेट पाठवले?


का चिनने प्रोजेक्ट ईस्ट टोकामक नाव दिले?


का फ़्रांसने प्रोजेक्ट वेस्ट टोकामक नाव दिले असावे?


सांगा तरी लोक म्हणतात​ आपला  देश मागे का? 


50 वर्षे मागे तुम्ही समजता देश. 


पण मी समजतो या सर्वांच्या पुढेच माझा भारत  देश आहे. ते कसे व का? माझ्याकडे याचे उत्तर आहे. बघु तुमच्याकडे सटीक उत्तर आहे का?


याला कवीता समजन्याची मोठी चुक करु नका.

"Please don't make the mistake of thinking this is a poem."

काय चालु आहे जगात डेटा सेंटर चा खेळ​?


क्लाउड सेंटर ?


अचानक हे काय घडत आहे जे हजारो वर्षात घडले नाही, आजच का घडत आहे?


याचे योग्य 100% उत्तर माझ्या कडे आहे तुम्ही देता का? सेम उत्तर 

विचार बदलले आज लोकांचे जावून राहूया अमेरीके का कारण तो सेफ़ आहे असे ? मानसिकता बदलून गेली का?


अभिमान मला आहे भारतात जन्मलो मी आणि हा अभीमान 2 अभीमान आहेत सिंगल नाही असे क​?


गुन गान गाने इतकेच पुरे असते का एखाद्याचे, पुढे अपेक्षा ठेवाव्या का नको आपल्याशी.


टेक्नॉलोजी घातक आहे असे आपणच म्हणतो आणि मानतो सुध्दा. 

चला न्यायाची व्याख्या सांगा? सटीक उत्तर माझ्या कडे आहे. तुम्ही पण तेच उत्तर देता का? 


मानसिकता बदलून गेली कारणीभूत कोण​?


थेट तंत्रज्ञानाला केलेले खुले चॅलेंज​. 

पळा तुम्ही कितीही पण गॅलक्सी ही मिल्की वे तुम्ही ओलांडू शकणार नाही. हे 100% सत्य​.

कसे ओलांडणार व कधी ओलांडणार याचे उत्तर माझ्याकडे आहे. बघु तुम्ही किती जण याचे उत्तर देता.??


एखादा बलाढ्य देश अत्याचार करतो आहे सर्वांवर, इथ पर्यंत की माझ्या देशाला सुध्दा धमकी देतो आणि सगळे शांतच बसले. आपल्याला काय करायचे आहे. आहेत सगळे बघणारे. माझ म्हणने असे नाही की युध्द करा. पण हा दंडमशाही नाही का? अन्याय अत्याचार स्वत​: करतो आणि म्हणतो की हि दोघे जन लई खराब आहेत आणि जग सुध्दा स्विकार करतो. परंतु त्याला तु कडू आहेस इतक सुध्दा म्हणन्याची ताकद होत नाही. अस का?

जरी तंत्रज्ञान क्षेत्र आमचा असला तरी विचार सुध्दा करु नये का?


चला हा विषय सोडा हो, निट पेपर फ़ुटला त्यावर तुम्ही काय केले ते सांगा 2 वाक्यात​?

मी केल मला समाधान आहे. तुम्ही काय केले ते सांगा ​?

सर्वांची दृष्टी फ़क्त बिझनेस वर आहे. जसे एक मेन ब्रॅंड व इतर काही पण एक मोठे संकट येत आहे त्यापासून सावध करणारा आपल्यातच उपस्थित आहे. तर कधी हो त्याच एकणार​?

ही प्रश्नं फ़क्त धाराशिव व महाराष्ट्रासाठी; नाही तर​ संपुर्ण भारतासाठी आहे.

लांडगा आला रे आला ही गोष्ट प्रत्येकाला माहित आहे पण त्याला जोड म्हणुन एक गोष्ट आणखी असायला हवी होती. ती म्हणजे , प्रलय येणारय रे बाबा. आणि तो जवळ आला रे आला. 

सत्य गोष्ट अशी की मानुष्य या तंत्रज्ञानासाठी इतका उतावळा, असतो की त्याला माहितच नाही की, आणखी  एक याच्या 1000 पटीने पुढे असलेला तंत्रज्ञान त्याची वाट पाहत आहे. 


एक गोष्ट जी तुम्ही कधीच विचार केली नाही. ज्या स्टीफ़न हॉकिंग ने 40 वर्ष आपले आयुष्य दिले तंत्रज्ञानाला, दुर्दैव त्याचे किती मोठे तोच ब्लॅक होलची साधी इमेज पाहण्यासाठी जिवंत नव्हता.

मी अस म्हणत नाही की तंत्रज्ञान सोडून द्या किंवा वाइट आहे.

ती मानवा साठी आहे मानव त्याच्या साठी नाही पण तो जागणार कधी कुणाच ठाउक? मी जागा झालो मला समाधान आहे परंतु एक प्रश्नच आहे जो पर्यंत तो सेक्युरीटी द्वारातून प्रवेश दिला जाणार नाही तो पर्यंत भिती मनात राहणार आहे. याच सुध्दा उत्त माझ्या कडे आहे तुम्ही द्या ना. (हा वाक्य उदासिनतेचा आहे)

अशा अनेक गोष्टी आहेत जो मोठा विषय मानसिकता बदलण्या करीता अख्ख्या जगाची, पण नाही; जर एखादा समुह स्वत​:ला सर्वात हुशार आम्ही आहोत हे डिक्लेर त्याने व लोकाने केले की संपल​. अशा समुहाला कोण समजावेल​. 


परंतु मनातच वाटले आपण शेवटी खेड्यागावची वेडी मानसं हे विसरलो होतो. 


म्हणुन शांतच ब्लॉग मार्फ़त एक महान असा संदेश देण्याचा असा प्रयत्न केला, असा प्रयत्न केला की एक मनात आगच निर्माण केली होती जी आजही जिवंतच आहे आणि ही आग विझू देणार नाही हा स्वत​:शी लढा आहे. म्हणतात ना की मानसाची किंमत तो जिवंत असताना लोक कधीच करत नाहीत तो गेला की मग त्याला लोक डोक्यावर घेतात​. परंतु या सर्व गोष्टीचा विचार तो व्यक्ती कधिच करत नसतोच​. कित्तेक थोर विचारवंत होवून गेले. पण मी त्यापैकी एक नाही फ़क्त एका महान वरी उल्लेख केलेल्या व्यक्तिचे संघर्ष, रिसर्च, मेहनतीचे फ़ळ मला एकट्याला न मिळता सर्वांनाच मिळावे हीच अपेक्षा पोटी इतका तांडव​, तमाशा, नाटक मी लावला आहे हे समजण्यास हरकत नाही.

आज पर्यंत प्रत्येक स्किमचा मी अतुट अंग होतो. वन डॉट सुध्दा. मला फ़ायदा पोचावा त्या करिता ग्राउंड लेवल वर कोण आलं नाही. मीच चालून आलो तुमच्या पर्यंत​. जरी भविष्यात वरिष्ठांनी मला आपल्यापासून वेगळे केले तरी मी मात्र मरेपर्यंत तुमचाच व तुम्ही माझेच.

Comments

Popular posts from this blog

भारतीय रुपया (INR) – Indian Rupee, महासत्ता आणि सत्ता टिकवण्याचा खेळ

  मीत्रांनो ही माहिती आवर्जून वाचा फ़ार फ़ार महत्वाची आहे. शेअर करायला विसरु नका. मराठी आवृत्ती (ठाम पण सन्मानपूर्वक): ही अशी माहिती आहे जी फक्त ज्यांच्याकडे न्यायबुद्धी, विचार करण्याची क्षमता आणि सामान्य समज आहे तेच समजू शकतात. ज्यांना वास्तवाकडे डोळसपणे पाहायची तयारी नाही, जे फक्त वरवर ऐकून मत बनवतात, त्यांना या गोष्टी कधीच कळणार नाहीत. जागतिक राजकारण हे साधं नसतं. ते समजण्यासाठी विचार, अभ्यास आणि निरीक्षण आवश्यक असतं. ज्यांना प्रश्न विचारायची आणि तथ्य तपासायची सवय आहे, तेच या गोष्टींचा खरा अर्थ समजू शकतात. 1️⃣ इराकी दीनार (IQD) – Iraqi Dinar हिंदी (Hindi) 1989 में स्थिति: 1989 में इराकी दीनार डॉलर के मुकाबले बहुत मजबूत था। 1 IQD ≈ $3.2 था। यानी एक दीनार के मुकाबले अमेरिकी डॉलर का मूल्य बहुत कम था। इसका कारण था कि इराक की अर्थव्यवस्था तेल पर निर्भर थी और सरकार ने अपनी मुद्रा को नियंत्रित रखा। 1990 के बाद: 1990 में इराक ने कुवैत पर हमला किया। इसके बाद संयुक्त राष्ट्र ने इराक पर कड़े आर्थिक और वित्तीय प्रतिबंध लगाए। इन प्रतिबंधों के कारण इराक का ...

जिया कंप्यूटर एज्युकेशन सास्तूर 1

English English मराठी ...

पोस्ट ऑफिस भरती 2026 ची पहिली मिरिट लिस्ट लागली आहे

  https://drive.google.com/file/d/1xd9NYhHwuyLyRRLT35DiPbRMo7HvNCDV/view?usp=drive_link 📮पोस्ट ऑफिस भरती 2026 ची पहिली मिरिट लिस्ट लागली आहे👆🏻👆🏻