Skip to main content

Posts

Showing posts with the label Garibi anvani

सत्तेच्या उबेत बसलेल्यांनो, 'टायर'च्या ओझ्याखाली दबलेलं हे वास्तव दिसतंय का?

  सत्तेच्या उबेत बसलेल्यांनो, 'टायर'च्या ओझ्याखाली दबलेलं हे वास्तव दिसतंय का? आज सोशल मीडियावर विकासाच्या गप्पांचा पाऊस पडतोय. 'डिजिटल इंडिया', 'बुलेट ट्रेन' आणि 'फाइव्ह ट्रिलियन इकॉनॉमी'च्या घोषणांचे ढोल इतक्या जोरात वाजवले जात आहेत की, त्या गोंगाटात एका गरीब कष्टकरी महिलेच्या अनवाणी पावलांचा आवाज कुणाला ऐकूच येईनासा झालाय. लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेलं हे चित्र केवळ एक बातमी नाही, तर या देशाच्या व्यवस्थेवर पडलेली एक मोठी चपराक आहे. पोटासाठीची ही जीवघेणी कसरत! चित्रात दिसणारी ती महिला डोक्यावर दोन-दोन टायर आणि हातात एक मोठा टायर घेऊन रस्त्यावरून चालतेय. तिच्या अंगावर धड कपडे नाहीत आणि सर्वात भयानक म्हणजे या रखरखत्या उन्हात तिच्या पायात साधी चप्पलही नाही. वाय. पी. पोवारनगर परिसरातलं हे दृश्य पाहून काळजात चर्र होतं. पण हे शल्य फक्त सर्वसामान्यांनाच का वाटावं? राजकारण्यांनो, तुमच्या खुर्च्या या ओझ्यापेक्षा जड आहेत का? निवडणुका आल्या की गरिबांच्या वस्तीत हात जोडून फिरणाऱ्या पुढाऱ्यांनो, एकदा हे चित्र नीट झूम करून बघा. तुमच्या भाषणातला 'विकास' या महिल...