👆
माझ्या सर्व वर्ग मित्रांना माझ्या जिवनातील सर्वात प्रिय, सर्वात मोठा जो माझा ध्येय आहे, जी माझी तळमळ आहे त्याचा सार मी वरील गोष्टीत आपल्यास देत आहे. या व्यतीरिक्त मी काही करु शकत नाही. ही माझी सर्वात मोठी जबाबदारी होती जी मला वाटते आज पुर्ण झाली आहे. ज्यामुळे मित्रानो माझे मन इतके म्हणजे एकदम हलके झाले असे मला वाटत आहे.
मित्रानो या ब्लॉगमध्ये आणखी अशा काही लिंक्स आहेत ज्यात स्पष्ठपणे उल्लेख केला आहे. ज्याची आतुरतेने अख्या जगातील निवडक व्यक्ती वाट पाहत आहेत. तेही तुम्ही वाचुन पुढे काय असे प्रश्न पडत असेल. मी नक्कीच सांगतो एक दिवस असा येईल की, काही जण पश्चाताप करतील तर काही चेहरे खिळलेली असतील. हा ब्लॉग बनविन्या मागे माझे कारण बसल्या बसल्या पैशे कमविणे होते पण. धिक्कार त्या गोष्टीवर, त्या विचारावर इतकी अनमोल गोष्ठ कस विकणार. खरचं हे विकण्यासाठी नाही तर वाटण्यासाठी आहे. म्हणुन या त्या गोष्टीकडे जी तुमच्यात आणि आमच्यात समान आहे.
आज जर एखादा व्यक्तीने दावा केला की तो रामाला भेटला आहे तर काय होईल? लोकं त्याची खिल्ली उडवल्या शिवाय राहणार नाहीत. बरोबर?
पण जर तुमच्या मित्रानेच हा दावा केला तर ? तुम्हाला खरं वाटेल ?
की तो कमीत कमी 12 ते 14 वेळा रामाला भेटला आहे व ते लोकांना उपदेश देताना ऐकले आहे. ते पण त्यांच्या समक्ष बसुन तर काय होईल? असाच आपल्या ग्रुप मधील आणखी एक जण आहे तो पण भेटला आहे पण लोकांच्या सांगण्यावरून तो चक्क त्याचा विश्वासच उडाला की हा राम आहे म्हणुन. किती दुर्दैव असेल त्याचे. पण हे त्याला कळेल आणि तो दिवस नक्कीच फ़ार जवळ आला आहे. 100% जवळ आली आहे वेळ. मी सतत आपल्याला प्रोजेक्ट इस्ट टोकोमाक आणि प्रोजेक्ट वेस्ट टोकोमाक बद्दल बोलतो आहे. मला माहित नाही मित्रानो तुम्ही या गोष्टीवर किती विश्वास ठेवता ते. कारण मानातील गुड तर फ़क्त परमेश्वरालाच माहित असते.
Comments
Post a Comment