*...वास्तवात काय घडत?*
विकास योजनांची आखणी ही गावातील सर्व घटकांना समान संधी देण्यासाठी असते. पण प्रत्यक्षात त्या योजना काही निवडक, प्रभावशाली लोकांच्या हातात केंद्रित होतात.
*योजना कशा वळवून लावल्या जातात?*
नावाची शिफारस: गावपातळीवर लाभार्थ्यांची नावे सत्ताधाऱ्यांच्या सूचनेनुसार ठरतात. गरीब व गरजूंना डावलून ओळखीच्या, घराण्याच्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जातं.
काम न होता पैसे उचलले जातात:
जलयुक्त शिवार किंवा मनरेगाच्या अंतर्गत अनेक वेळा प्रत्यक्षात कामं होत नाहीत, पण हजेरी दाखवून निधी काढला जातो.
*महिलांना डावलणं:*
महिला बचतगट किंवा महिला विशेष योजनांमध्ये वास्तविक महिलांपेक्षा पुरुषांचा हस्तक्षेप अधिक असतो.
*आरक्षणाचा अपप्रयोग:*
अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव योजनांचा लाभ त्यांच्या नावावर घेतला जातो, पण प्रत्यक्ष फायदा इतर कोणालातरी मिळतो.
*परिणामी काय घडतं?*
सामान्य लोकांमध्ये नैराश्य वाढतं.
शासकीय यंत्रणेवरचा विश्वास उडतो.
गावात सामाजिक अंतर वाढतं.
खरी गरज असलेली व्यक्ती उपेक्षित राहते.
*उपाय काय?*
ग्रामसभा सक्षम करा: ग्रामसभेत पारदर्शकपणे लाभार्थ्यांची यादी मांडावी आणि त्यावर चर्चा व्हावी.
*सामाजिक लेखा परीक्षण (Social Audit):*
सर्व योजनांचं लेखाजोखा गावपातळीवर मांडावा.
*योजना बोर्ड लावा:*
पंचायत कार्यालयात लाभार्थ्यांची माहिती सार्वजनिक करा.
*शिकवणूक द्या:*
लोकांना त्यांच्या हक्कांची माहिती द्या आणि तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुलभ करा.
*निष्कर्ष:*
ग्रामपंचायत ही लोकशाहीचं मूळ आहे, पण जर तीच सत्तेच्या केंद्रीकरणाचं माध्यम बनली, तर गावाचा खरा विकास होणार नाही. त्यामुळे सामाजिक जागृती, पारदर्शक कारभार आणि सव्व सहभागी लोकशाही या त्रिसूत्रांनीच ग्रामविकास शक्य आहे.
Comments
Post a Comment