संपुर्ण भारतात फ़क्त एकच राज्य असा आहे ज्याची सुरुवात महा ने होते म्हणुनच महाभारत हा एक नाव नसुन यात अनेक रहस्य दडले आहेत ज्यात भारताचे नव्हे तर ब्रम्हांडाचे रहस्य म्हणन्यापेक्षा ब्रम्हांडाचे भविष्य दडले आहे असे मी म्हणतो कारण रहस्य हे सगळ्यासाठी नसते ते किंचीत लोकांसाठी असते. पण एक दिवस ते रहस्य सगळ्यांसमोरे येते तरी ते सर्वांसाठी समजने कठीण असते. अनेक लोक, शास्त्रज्ञ, समाजशास्त्र तज्ञ, लेखक, कवी, राजा, महाराजा, शिक्षक, पंडित, मौलवी, डॉक्टर हे सर्व मिळुन सुध्दा फ़क्त तर्क तर लावु शकतात पण जे रहस्य, गुड असते ते शोधु शकत नाहीत याचे ही एक मोठे कारण असते ते म्हणजे काही जबाबदारी म्हणजे महत्वाची जबाबदारी ही एकावरच असते हा सृष्टी निर्मात्याने ठरवुन ठेवलेले असते. या सर्व गोष्टी समजन्यासाठी सर्व प्रथम सृष्टी निर्मात्याला समजावं लागेल जसे त्याला समजन्याचे हक्क आहे, त्यानंतर त्याने पाठवलेले अवतार, संदेष्ठा, प्रेषीत, मेसेंजर ला समजने हे ही तितकेच महत्वाचे असते. प्रेत्येक अवतार, संदेष्ठा, प्रेषीत, मेसेंजर हा सृष्टी निर्मात्याच्या जवळ समानच असतो, सारखाच असतो. त्याचे कार्य सारखेच असतात. परंतु प्रत्येक युगात, काळात लोकांचे राहनीमान, प्रथा, रुढी, परंपरा, चाली रीती ह्या वेगवेगळ्या होत्या. पण या पृथ्वीवर राहणारे लोक हे सुरुवातीपासुनच एक सारखी नसायची व आजही ते एकसारखी नाहीत. म्हणजे काही लोक चांगली असता तर काही खुप चांगली असतात तसेच काही लोक वाईट असतात तर काही फ़ार वाईट असतात हे सर्वांनाच माहीत आहे.
पण एक गोष्ट जि फ़ार महत्वाची आहे प्रत्येक ग्रंथाला माननारा व त्या धर्माला माननारा व्यक्ती हा अन्य धर्म व धर्मग्रंथाबद्दल द्वेष ठेवतो हि अत्यंत वाइट, दुर्दैवी बाब आहे. जर आपण पाहिल्या हा एक प्रश्न सर्वांसाठी आहे. देव, इश्वर, भगवान, परमेशवर, रब, अल्लाह, गॉड हा एक आहे व का तो कुण्या एका धर्माचा आहे? का एका ग्रंथाचा आहे? नाही तो एकच आहे सृष्टी निर्माता हा एकच आहे. सर्वांचे उत्तर एकच येइल. त्या परमेश्वाराची एक रित, नियम म्हणा अथवा आणखी काही म्हणा की, ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर पाप वाढले, लोक अंधकाराच्या दिशेने वाट धरले, चुकिच्या मार्गाचा अवलंब केले त्या त्या वेळेला त्याने आपला अवतर म्हणजेच या पृथ्वीवर आपल्यातुनच एका अशा व्यक्तिला जन्म द्यायचा, एक असा मानव जन्माला घालायचा त्याला प्रेशित म्हणा, अवतार म्हणा, संदेष्ठा म्हणा, पैगंबर म्हणा काहीही नाव द्या. तो येवुन त्या देवाची, त्या इश्वराची, त्या परमेश्वराची, सृष्टी निर्मात्याची, गॉडची, अल्लाहची ओळख करुन द्यायचा व लोकांना त्याचे उपदेश करायचा पण किंचीत कमी लोक त्याची गोष्ट मानायचे, तो अवतार परमेश्वराच्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगायचा, इथपर्यंत की परमेश्वराच्या सांगण्यावरुन, किंवा दाखवन्यावरुन, तो भविष्यवाण्याही करायचा जसे कि त्याच्यानंतर कोण संदेष्ठा येइल, कसे येइल, व शेवटचा दिवस काय असेल, त्याबद्द्ल काही माहीती सांगायचा. निशानी, खुन, काहीना काही सांगायचाच. हीच पध्दत शेवट पर्यंत चालु होती पण एक शेवटच्या अवताराबद्दल प्रत्येक धर्मग्रंथात काहिना काही भविष्यवाणी, पेशनगोई आजही भेटते. परंतु त्या त्या धर्मग्रथांचा अभ्यास करणारे काहीना काही तर्क वितर्क करुनच ठेवले आहेत व जनता त्यांच्या तर्कावर आजही ठाम आहे. पण एक प्रश्न त्यापेक्षाही मोठा असा आहे की, परमेश्वर त्या अभ्यासु व्यक्तीच्या तर्कावर त्याचा निर्णय घेणार का?????? हा फ़ार मोठा प्रश्न आहे व रहस्य हि आहे....
त्या परमेश्वराचा कोण मालक आहे? कुणीच नाही. तो त्याच्या परेने, त्याच्या इच्छेने निर्णय घेणार, पाऊल उचलनार यात शंका नाही. विचार करण्यासाठी आणखी एक मोठी गोष्ठ म्हणजे त्या परमेश्वराने त्याचा प्लॅन, नकाशा, आराखडा, सृष्टीची रचना, मानव जन्म, मृत्यु, अवतार कोणता कधि व कुठे पाठवावा, कसा पाठवावा, त्याचा अंत, पुन्हा काय इ. सर्व गोष्टींची प्लानिंग अगोदरच करुन ठेवली आहे व या सर्व गोष्टींबद्दल प्रत्येक धर्मग्रंथात व धर्मगुरु यांना माहितच आहेत. पण त्या प्रत्येक गुरुच्या खालच्या म्हणजे त्यांचे शिष्य त्या गुरुंच्या पुढे 10 पट विचार करणारे निघाले व त्या ग्रंथाचा कसुन म्हणजे त्यांच्या परेने अभ्यास करुन आम जनता, लोकांमध्ये त्यांचे तर्क वितर्क फ़ार भरमसाठ स्वरुपात पुस्तक रुपी स्वरुपात आणुन ठेवले आहेत. याचा परिणाम असा झाला कि आज लोक या गोष्टीला घेउन फ़ार चलविचल, कन्फ़्युज आहेत, भ्रमिष्ट आहेत की, नेमके होणार तरी काय? या विचारात आहेत. याचे एक पुन्हा उदाहरन द्यायचे झाले तर एकच उदाहर जे सर्व धर्मग्रंथात मिळेल. रावण, ऍंटीक्राइस्ट, धज्जाल चे उदाहरण आहे. हा दुसरा तिसरा कुणीच नाही हा एकच आहे. जोपर्यंत हे समजणार नाही तो पर्यंत काहीच समजण फ़ार आणि फ़ार कठीण आहे. ह्या सर्व भविष्यवाण्या आहेत. हे समजने सोपे पण आहे कधिपर्यंत जोपर्यंत निर्णय घेणारा व्यक्ती हा स्ववलंबी असला पाहिजे, स्वत: विचार केला पाहिजे व विचार करुन अंतिम निर्णय त्याचा स्वत:चा असेल तरच हे रहस्य, गुड त्याच्या डोळ्यासमोर दिसेल यात कसलिच शंका नाही.
त्यासाठी काय केले पाहिजे सर्व धर्मात ज्या भविष्य वाण्या आहेत त्याला एक ठीकाणी जमा करा व बघा कि हे सर्व काय दर्शवत आहेत, यात काय समानता आहे बघा, आपल्या बुध्दीला कामाला लावा पहा कि याची तार दुसर्या ग्रंथाशी कशि जुळत आहे, दुसर्या भविष्यवाणी शी कशी जुळत आहे. शेवटी संदेश काय आहे हे सर्व वाचन करुन समजुन घेणे फ़ार फ़ार गरजेचे आहे.
Comments
Post a Comment