https://chat.whatsapp.com/LiEoHW0WRGI6N6DVUZ4kbR
लोक निष्ठेने आणि प्रतिष्ठेने कशे राहतात याचे एक ज्वलंत उदाहरण सांगतो. वाचा पुढे - कुणालाही एक रुपाया देणार नाही - दमडीचा चहा पाजवणार नाही - दमडीची घरपट्टी भरणार नाही - पण मोठ ज्ञाण झाडण्यास पुढे एकदम अग्रेसर जनु हे थोर विचारवंतांचे वंशज - या उलट फ़ुकट खाणार लोकाच, दम येइ पर्यंत पेणार, गावातील फ़ुकट पाणी घेणार - थोड तरी विचार कराव हे पाणी येतोय ते बोर, मोटर, लाईट बिल, पाणी सोडणारे कर्मचारी ची पगार इतर. हा विचार कोण करतं का? मान्यवारांनो जर यांची परिक्षा घेउन त्या काळात शासना तर्फ़े जसे आज पोलिस भरती, शिक्षक भरती, तलाठी, ग्रामसेवक इ. होते ना त्या प्रकारे केले असते तर हे लेखीला, मुलाखतीला पात्र झाले नसते बरोबर ? अशा व्यक्तींनी ग्रुप वर मोठ्या बाता हाणु नये. मानल पाहिजे कै. (आदरणीय) माळी गुरुजी, पुर्णे गुरुजी, इंडे गुरुजी, काया पलटुन टाकणारे सुतार साहेब, आदरणीय बलभीम मास्तर इ. लोक ज्यांची वचक अशी होती की, पालक सुध्दा त्यांच्या समोर तंबाखु खान्यासाठी थरथरत होते आणि आता बघा हे टोनगे स्वत: तोंडात भरलेला असतो देवा रे देवा आता येणार का ते दिवसं ?
विदेशातील लोकं हे स्वत:साठी जगतात भारतातील युवक हे लोकांसाठी जगतात, त्याला जाणीव असते गरीबीची हे दिवस आणले कोण विदेशी संस्कृती भारतात शिरली, शिक्षकात शिरली जुणे शिक्षक अत्ताच उदाहरण दिल ते मुलांन्ना क्रांतीकारी बनवायचे आत्ताचे शिक्षक हे स्वावलंबी बनवतात वरी सांगितल्या प्रमाणे. बाबासाहेब हे क्रांतीकारी होते म्हणुन तुम्ही शिक्षक झालो पण शेवटी तुम्ही स्वावलंबी झालो ही खंत आहे.
ज्ञान झाडणारा कार मध्ये गॉगल घालुन बसलय हे त्याचा अहंकार सरळ सरळ झळकत आहे. गांधीजी आणवानी फ़िरले भाऊ, थोर लोक जेल भोगले भाउ.
पडद्यामागुन काम करणारे हे शिक्षक असतात जे निस्वार्थपणे काम करणारे असायचे पण आता.
अत्ताच्या युवकाला शिक्षकाची गरजच नाही कारण तो लहान पणा पासुनच गुगल गुरु सोबत जन्मत आहे. तुम्हीच उदाहरणे देता 10 फ़ेल झाला आणि सचिन झाला. तरी बघितल गेले तर सचिन ला लाभलेला शिक्षक तो 19 व्या शतकातला होता.
जर त्याने शिक्षकाला विचारले क्रांती करु का अभ्यास करु तर शिक्षक आत्ताचा म्हणतो नको अभ्यास कर पण त्याच्या पेक्षा या बाबतीत तर गुगल बरा कारण तो क्रांतीची दिशा तर दाखवतो शिक्षक वैर नाही पण सत्य परिस्थिती हीच आहे पगार आणि त्याचा घर वाचवण्यासाठी ते शाळा वाचवतात हो तर गाव वाचवल पाहिजे तरच गावातील विद्यार्थी व शाळा दोन्ही सुरक्षीत राहतात. उमेश भाऊ 5 गाड्या चाल्या भर भरुन बाहे शिकण्या करीता का ? का जात आहेत ? कोण कमी पडलं ?
लातुर कडे जाताना लागतो गाव सास्तूर पेक्षा बारकं गाव आहे, लोहारा जाताना गाव सास्तूर पेक्षा बारकं गाव आहे, राजेगाव सास्तूर पेक्षा बारकं गाव आहे तिथ ही गेले. का ? तो गाव ज्याची संस्था सगळ्यात जुनी आहे स्वतंत्र काळातील. पवार बंधु हे शेती करत करत प्रयत्न करत आहेत पण प्रशासन कोण त्यांच्या पाठीशी उभा आहे, गावातील लोकांची सुध्दा जबाबदारी आहे की नाही?
आता जायला नको आहे ते क्वालीटी इथ भेटली पाहिजे.
अशा मातितला एक व्यक्ति पुढे आलाय ज्यात आम्हि ते गुण पाहिलेत जो निस्वार्थपणे काम करतो. एक म्हण आहे की, "मनगटाला धरुन विचारायला काळीज लागतं काळीज." तर अशा काळजा व्यक्ती समोर आला आहे लोकांनो अता तरी जागे व्हा रे बाबांनो. पुर्वी लोकं म्हणायचे सास्तूरला कॉलेज येत नाही कॉलेज युवू शकत नाही पण या मातीत जन्मलेल्या अशाच एका आई - बापाचा मुलगा आदरणीय जगदे गुरुजी यांनी 2 वर्ष कॉलेज चालवून दाखवले का नाही? गरज होती का हो त्या व्यक्तीला हे करण्याची ? काय स्वार्थ होता त्याचा ? काय भेटल त्याला ?
गावकरींनी त्या कॉलेजला ठेवलेल्या नावाचा (श्री शांतेश्वर आर.पी.ज्युनिअर कॉलेज) विचार करायचा होता. तशाच आई - बापाचा एक मुलगा पुन्हा समोर उभा राहीला आहे आता तर पुढे या. सास्तूरच्या लोकांत दम असेल ना दम कॉलेज आणुन दाखवा गावात. एकाने दाखवला आणि ते करुन दाखवला. पण गाव वाल्यांना ते जपता आले नाही. त्यांच्या पेक्षा 10 पटीचा दम असणारा कणखर व्यक्ती समोर उभा आहे या मातीला तो मुलगा उमेश दादा बारकुले लोकांनो तुम्हाला याचे पुरावे देण्याची गरज नाही. "तो करु शकतो बर का." वेळ आली आहे जरा जागे व्हा, वैर विसरा, डोळे उघडा, जागे व्हा - बस करा गुलामगिरी सोडा, सोडा डोनेशन देउन लागलेल्या नोकरीच्या लोकांची बैठक, बसा मेहनत जिद्द चिकाटीने लागलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर. तो खांद्यावर उचलुन तुम्हाला नदिला आलेल्या पुरातून पलिकडे जाण्यास सज्ज आहे. नका करु याकडे दुर्लक्ष हे कुण्या ऐर्या गैर्याचे शब्द नाहीत, कुण्या चॅट जिपीटी बॉटचे शब्द नाहीत, हे सुध्दा याच मातीतून उगवलेल्या एका मोडक्याचे शब्द आहेत ज्याने ही असाच एक भयानक प्रयत्न केला होता व करत आहे लक्षात ठेवारे मित्रांनो केलेले प्रयत्न कधीच - कधीच वाया जात नाही. हे बोल अंगाला शहारा आणत आहेत. आता व्हा रे जागे, आता व्हा रे जागे ग्रुप वरच्या तमाम महाराट्राच्या मातीतील तमाम बिज व्यक्तींना मोठे आव्हान आहे आता गरज आहे त्याला तुमची जो तुमचा प्रश्न मोकळा करण्या करीता परत आला आहे. 💐🙏
Comments
Post a Comment