याला नाव आज शाळेचंच देवून टाकतो.
श्री शांतेश्वर विद्यालय, सास्तूर.
कारण मी विद्यार्थी या शाळेचा.
मला माहीत आहे हे लिखान लिहत असताना किती त्रास होतो, विचार करत असताना काय मनावर घडतं ते. तुम्ही कधी पेन घेवून बसा, नाहीतर माझ्या सारख किबोर्ड घेवून बसा मग समजतं की काय परिणाम होतय ते. एखाद्या लेखक जर कुणी असेल तर तो समजु शकतो, जो एकदम नागवा असतो, त्याच्याकडे शिवाय अशा विचारांचे दुसर काहीच नसतं.
फ़क्त तळमळ, सर्वांना माहित आहे मी राजकारणी माणुस नाही. मला यात रस सुध्दा नाही. 2010 ते 2012 फ़क्त या काळातच मनसे कार्यकर्ता म्हणुन डायरेक्ट लोहारा पंचायत समिती करीता नॉमिनेशन फ़ॉर्म भरला होता. शेवट पर्यंत सगळे मित्र पळून गेले तरी सुध्दा एकटाच उभा होतो, परंतु चक्क पाय धरले एकाने, म्हणुन तो फ़ॉर्म मी परत घेतला. मनसेचा तिकीट सुध्दा आला होता.
कै. तानाजी पाटील हे सुध्दा वामन चिमुकले यांच्या मुलीच्या लग्नात भेटून त्यांनी कौतुक केल, "इतकी डेरींग कशी केलास फ़ारुक" म्हणुन. कधीही ते म्हणायचे तु ये आमच्या सोबत म्हणुन. त्यावर मी हसलो व ते पण खांद्यावर हात थापटून निघुन गेले. आजही ते शब्द, त्यांचा तो बोलण्याचा अंदाज कानवर पडल्यासारखे वाटते.
म्हणुन सांगत आहे, प्रत्येकालाएकाच गोष्टीकडे लक्ष वेधन्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या गोष्टीवर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण हे सर्वांसाठी शेवटची संधी आहे, शेवटचा युग आहे, जे काही तुम्हाला चांगले काम,कार्य करायचे आहेत करुन घ्या, एक अशी वेळ लवकरच येणार आहे ज्याची सुरुवात झालेली आहे.
चक्क माणुसकीच नष्ठ होत चालली आहे. आख्खी संस्कृती जी सर्वात सुंदर भारतीय संस्कृती आहे, ती सुध्दा आता फ़क्त आणि फ़क्त पुस्तकातच सुंदर दिसत आहे. मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातुन हा संदेश प्रत्येक तो व्यक्ती ज्याचा विश्वास मरुन पुन्हा उठण्यावर आहे त्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जितकी पुस्तके वाचणार आहात वाचुन घ्या. आत्ताच आपण पाहतो आहोतच की पुस्तके संपली आहेत याचा अर्थ वाचनालय रिकामे दिसतात.
11/05/2026 तारखे रोजी डॉ. मुगळे सर यांची सुध्दा भेट घेतली. मी व उमेश दादा बारकुले यांनी.
सरांनी फ़ार काही गोष्टी संबंधी माहिती दिली, संवाद केला, गप्पा झाल्या त्यात एक गोष्ठ सरांनी सांगितली ती म्हणजे रोज दोन तास वाचन.
त्याच महत्व फ़क्त तोच समजु शकतो जो रोज पुस्तके वाचतो.
आदरणीय डॉ. मुगळे सर मी आपल्याला एक वचन देत आहे आज या ग्रुपच्या माध्यमातुन, हे फ़ार आणि फ़ार मोठे वचन आहे. मी जो ब्लॉग लिहीला आहे, ज्यावर मेहनत घेतली आहे, त्यात काही अशे विषय दडवून ठेवले आहेत, त्यात जे जे विषय मी मांडले आहेत. ते इतके महत्वाचे आहेत आणि ते इतके सत्य आहेत की, त्याची सत्यता नक्की व 100% माझे डोळे बंद झाल्यानंतर समोर येतील. सर मी कधीही, कुठलीही गोष्ठ हे स्वार्थासाठी केलीच नाही.
तुम्ही शिकवल्याप्रमाणे माझ्यामुळे दुसरे अन्य लोकांचा कसा फ़ायदा होईल हेच विचार सतत सोबतच असतात. आजही तेच विषय पुढे सांगत आहे.
हा ब्लॉग मी एम के सि एल चे माजी मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय श्री विवेक सावंत सर यांच्या पर्यंत पोहचवण्याचा पुर्ण प्रयत्न केला आहे व ते वाचलेही असतील लवकरच त्यावर प्रतीक्रिया येणार अशी अपेक्षा आहे.
सर मी सतत एक वाक्य बोलत असतो की, लवकरच एक नवीन प्रवास सुरु होणार आहे, तो कंपलसरी प्रत्येकाला करणे भागच पडणार आहे. प्रोजेक्ट इस्ट ऍण्ड वेस्ट टोकोमाक हा तोच प्रोजेक्ट असणार आहे ज्याची भीती हजारो वर्षांपुर्वी वर्तविली गेली आहे.
या बद्दल ब्लॉगवरच वाचने हे चांगले ठरेल. निस्वार्थ पणे केलेल्या कार्याचा मोबदला व त्याची अपेक्षा मला मानवतेकडून कदापी नको आहे व ती मी केलीच नाही. सास्तूरचा सुपूत्र, सास्तूरच्या मातीत जन्मलेला मी व मला याचा मोठा अभीमान ही आहे.
Comments
Post a Comment