ग्रामविकासाला अडथळा नेमका कोण?
अनुभवातून आलेली सत्य परिस्थिती
गावात एक गोष्ट वारंवार निदर्शनास येत आहे — जेव्हा जेव्हा ग्रामसेवक गावात येतात, तेव्हा काही ठराविक ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या मागे-पुढेच असतात. ते काय करतात, कोणत्या योजना येणार आहेत, कुठे निधी येतोय, काय मंजूर होणार आहे — हे सर्व जाणून घेण्यातच त्यांचा जास्त वेळ जातो.
गावाच्या प्रश्नांसाठी?
लोकांच्या अडचणींसाठी?
की विकासकामांच्या पाहणीसाठी?
की मग प्रश्न असा पडतो —
👉 “आपल्यालाही यातून काही मिळेल का?”
👉 “आपलाही वाटा लागेल का?”
हा उत्साह गावाच्या विकासासाठी असता तर आनंदाची गोष्ट होती.
पण प्रश्न असा आहे की,
👉 विकास कामे प्रत्यक्षात का होत नाहीत?
👉 योजना येतात, पण जमिनीवर का दिसत नाहीत?
एकदा गंमतीत, पण खूप काही सांगून जाणारी एक चर्चा मला एका बिल साहेबांसोबत झाली. त्या गप्पांमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले:
“गावाच्या विकास कामांना जर अडथळा येत असेल, तर तो बाहेरून नाही.
तुमच्याच गावाचे निवडून दिलेले काही सदस्यच अडथळा निर्माण करत आहेत.
मी काय बाहेरचा माणूस आहे. मी सरकारी सेवक आहे.”
ही वाक्ये खूप बोलकी आहेत.
सरकारी अधिकारी योजना घेऊन येतो, निधी मंजूर करतो, कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करतो. पण जर गावातच मतभेद, स्वार्थ, गटबाजी आणि जबाबदारीपासून पळ काढण्याची वृत्ती असेल, तर विकास थांबतो.
अनेक गोष्टी अशा आहेत,
ज्या इथे सविस्तर मांडता येणार नाहीत,
पण गावकऱ्यांना त्या जाणवत आहेत, अनुभवायला मिळत आहेत.
आज प्रश्न कोणावर आरोप करण्याचा नाही,
तर आत्मपरीक्षणाचा आहे.
👉 ग्रामपंचायत सदस्य हे “माहिती गोळा करणारे एजंट” नसतात.
👉 ते गावाच्या विकासाचे प्रत्यक्ष शिल्पकार असायला हवेत.
जर काही मोजकेच लोक सगळं ठरवत असतील आणि बाकी फक्त शांत बसून पाहत असतील, तर ही लोकशाही नाही — ही निष्क्रियता आहे.
गावाचा विकास बाहेरून कोणी येऊन करणार नाही.
तो गावातूनच, निवडून दिलेल्या लोकांनीच करायचा असतो.
आज नाही तर उद्या,
गावकऱ्यांचे प्रश्न वाढतील,
आणि ते प्रश्न थेट विचारले जातील.
वेळीच जागे व्हा.
पदासाठी नाही, तर जबाबदारीसाठी उभे राहा.
कारण इतिहास पद कोणाकडे होते हे नाही,
तर गावासाठी कोण उभा राहिला हे लक्षात ठेवतो.
Comments
Post a Comment