याला प्रतिउत्तर म्हणुन उत्तर.
मी केलो आहे असा विवाह साधारण त्याचे पुरावे गावात विचारु शकता मला समाधानही आहे आणि अभिमान ही आहे व मला या अतीमहत्वाच्या विषयावर बोलायचा अधिकारही आहे. कारण जि गोष्ठ आपन बोलतो तर त्यावर अम्मलबजावणी करणे हे तितकेच महत्वाचे असते. आज लोकांजवळ ज्ञान तर भरपुर आहे पण अमलबजावणी 0 आहे. लोकांना माहिती असते कोण खरं वागत आणि कोण दाखवण्यासाठी किंवा मोठे मोठे बोलतो तर पण जसे बोलतो तसे चालतो का हे स्वत: मध्ये झाकुण भघतच नाही. पण दुसरे लोकांकडे मात्र जरुर बघतो बोट करतो. सत्य इतके कटु असते त्याला पचवण्याकरीता विषरुपी समाजाचे तिरस्कार सहण करण्याकरीता इतकी हिम्मत लागते. त्याचे ज्वलंत उदाहरण मी आहे. हे गर्वाचे बोल नसुन अनुभवाचे बोल आहेत, जे स्वत:च्या समाजाच्या रुढी परंपरांना लाथ मारुन 1400 वर्षापुर्वीच्या माझ्या नबीच्या पावलांवर चालतो. त्या करीता मला कुणाच्या प्रमाणपत्राची कुण्या(मौलवी , पंडीत इ..)ची गोष्ठ ऐकायची गरजच नाही. कारण आजचे (मौलवी , पंडीत इ..) हे पगारासाठीच असतात यात शंकाच नाही. जर तो पगारासाठी नमाज आणि मशिदशी बांधला गेलेला आहे. आणि लोक आंधळे होउन त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. सत्य काय आहे हे जानुन घेतच नाहीत. टेक्नॉलोजि हे काय आहे त्यांना माहीतीच नाही. जगाद जसे बदल होते हि मानसे ही तशिच बदलत आहेत. पण मला अभीमान आहे मी ति चुक करण्यापासुन वाचलो जि चुक पुर्वज करुन गेले यहुद, नसारा आणि इतर .... ज्ञान तर इतके होते पण सत्य पचविले नाही. आणि जसे प्रत्येक अवताराला याच लोकांनी त्रास दिला ... जनता मात्र भिकुरडी असते तमाशा बघने त्यांचा जुना व्यसनच आहे. पण बोटावर मोजने इतकेच असतात जे आपला जिव धोक्यात घालुन सत्य बोलतात आणि त्याच्यावर चालतात. कशाचीच परवा करत नाहीत.
प्रतिउत्तर : बोलण्यापेक्षा जगून दाखवणे महत्त्वाचे
वरील लेख वाचताना अनेक मुद्दे योग्य वाटतात, काहींशी मी पूर्णपणे सहमतही आहे. परंतु एक गोष्ट ठामपणे सांगावीशी वाटते — फक्त बोलणे आणि लिहिणे पुरेसे नसते, त्या विचारांवर स्वतः चालून दाखवणे अधिक महत्त्वाचे असते.
मी हा विवाह तत्त्वतः आणि प्रत्यक्षात करून दाखवलेला आहे. याचे पुरावे गावात कुणालाही विचारले, तरी मिळतील. मला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे, कारण मी जे बोलतो ते जगून दाखवले आहे. आणि हो — मला त्याचे समाधानही आहे आणि अभिमानही आहे.
आज समाजात ज्ञानाची कमतरता नाही. ज्ञान भरपूर आहे, पण अंमलबजावणी शून्य आहे.
लोकांना नीट माहिती असते की कोण खरे वागते आणि कोण फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलते. पण स्वतःकडे पाहण्याची हिंमत फार कमी जणांमध्ये असते. दुसऱ्यांकडे बोट दाखवणे सोपे असते; स्वतःच्या आयुष्याचा आरसा पाहणे मात्र अवघड असते.
सत्य नेहमी गोड नसते.
सत्य कटू असते — आणि ते पचवण्यासाठी प्रचंड धैर्य लागते.
त्या सत्यावर चालण्यासाठी समाजाच्या विषारी टीका, तिरस्कार, बहिष्कार सहन करण्याची ताकद लागते. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे.
हे गर्वाचे बोल नाहीत; हे अनुभवातून आलेले शब्द आहेत.
मी माझ्या समाजातील रूढी-परंपरांना डोळे झाकून मान्य केले नाही.
मी १४०० वर्षांपूर्वी माझ्या नबी ﷺ यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला.
त्यासाठी मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, ना कुण्या (मौलवी , पंडीत इ..)च्या शिक्क्याची. कारण आज दुर्दैवाने बहुतांश (मौलवी , पंडीत इ..) पगाराशी बांधले गेलेले आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. जे स्वतः पगारासाठी मशिदीशी बांधले गेले आहेत, त्यांच्याकडून निर्भय सत्याची अपेक्षा कशी करायची?
लोक आंधळेपणाने विश्वास ठेवतात, पण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत.
तंत्रज्ञान काय आहे, जग कुठे चालले आहे, समाज कसा बदलतो आहे — याची जाणीव ठेवण्याची तयारी फार कमी लोकांमध्ये आहे.
जग बदलत आहे, माणसं बदलत आहेत; पण काही जण अजूनही विचारांनी शतकांमागे अडकलेले आहेत.
इतिहास साक्षी आहे —
ज्ञान असूनही सत्य न स्वीकारल्यामुळेच अनेक समाज, अनेक जमाती भरकटल्या.
प्रत्येक अवताराला, प्रत्येक सत्यवक्त्याला याच समाजाने त्रास दिला आहे.
जनता बहुतेक वेळा तमाशा पाहणारी असते — ही जुनी सवय आहे.
पण बोटावर मोजण्याइतकेच लोक असे असतात, जे आपला जीव धोक्यात घालून सत्य बोलतात, सत्यावर चालतात आणि कुणाचीही पर्वा करत नाहीत.
म्हणूनच, विवाहाबद्दल, पैशांबद्दल, समाजाबद्दल बोलताना
फक्त लेखनात नव्हे तर आयुष्यातही ते उतरवण्याची तयारी असावी लागते.
मी ती तयारी केली, म्हणूनच आज मी समाधानाने उभा आहे.
बोलणारे अनेक असतात.
जगून दाखवणारे फारच थोडे.
माझे नबी मुहम्मद स.अ.स. तर सांगतात जो नमाज पढत नाही तो आमच्यातुन नाही. मग लोक बिनधास्त पणे नामाज सोडतात.
आम्ही फ़तवा देत नाही फ़तवे अगोदरच पुर्ण देउन गेले आहेत. हदिस मध्ये आहे दिन मध्ये नमाज चा दर्जा असा आहे जसा मानसाच्या शरीरात डोके जसे बिना डोक्याचे मानुस नाही तसे बिना नमाजचे मुसलमान नाही" अस मी तर म्हणत नाही पण माझे नबी सांगुन गेले आहेत. तर हि गोष्ठ सत्य आहे ना मग आता बघा विचार करा जो नमाज पडत नाही किंवा उग कुठ 1 वेळ दोन वेळची पडतो किंवा जुम्म ला जुम्मा पडतो. तो कोण आहे तुम्हीच विचार करा. फ़तवा आम्ही लावत नाही.
माझे नबी सांगतात विना कारण कुणाला काफ़िर म्हणु नका नाही तर तो कुफ़्र त्याच्या कडेच परततो.
जनतेला प्रश्न विचारु देत नाहीत ज्ञान ठेवाणारा (मौलवी असु शकतो, पंडीत असु शकतो इ..)
एखादा विचारतो सिध्द करतो तर त्याला असा विरोध करतात की, जनता हे बघुन घबरुन जाते आणि म्हणते अरे बापरे खरच आहे की, (मौलवी, पंडीत इ..) खरच बोलतात हा मानुस चुकिच्या मार्गावर आहे की. असे म्हणुन हि जनता आंधळी बनते. पण जरा बघा थोड थांबा लवकरच इशवाराचा वादा पुर्ण होणार जसे त्याचे वचन आहे. 9 मोठ्या भविष्यवाण्या पुर्ण झाल्या अता कयामत ही येणार यात कुठली शंका शेवटची निशानी पश्चिमेकडुन सुर्य तोही 90 % फ़्रांसचा संशय आहे ज्याने प्रोजेक्ट वेस्ट टोकामक लॉन्च केला.
— फ़ारुख उमर केळगावे
Comments
Post a Comment