Skip to main content

Posts

श्री शांतेश्वर विद्यालय, सास्तूर

  श्री शांतेश्वर विद्यालय, सास्तूर Shri Shanteshwar Vidyalaya, Sastur विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता | Student Code of Conduct इयत्ता १ ली ते १० वी | Grades I to X विद्यार्थ्यांनी काय करावे | What Students Should Do १. नियमित व वेळेवर शाळेत या. Attend school regularly and arrive on time. २. स्वच्छ व नीटनेटका शालेय गणवेश परिधान करा. Wear a clean and proper school uniform every day. ३. शिक्षक, पालक आणि ज्येष्ठांचा नेहमी आदर करा. Always respect your teachers, parents, and elders. ४. दररोज अभ्यास करा व गृहपाठ वेळेवर पूर्ण करा. Study regularly and complete your homework on time. ५. वर्गात शांतता, शिस्त आणि सभ्य वर्तन ठेवा. Maintain discipline, silence, and good behaviour in the classroom. ६. शिक्षक शिकवत असताना लक्षपूर्वक ऐका. Listen carefully while your teacher is teaching. ७. काही समजले नाही तर विनम्रपणे प्रश्न विचारा. Ask questions politely whenever you do not understand something. ८. सर्व विद्यार्थ्यांशी प्रेमाने, आदराने आणि मैत्रीपूर्ण वागा. Treat every student with kindness, respect...

रौप्य महोत्सवी वाटचाल

  रौप्य महोत्सवी वाटचाल दोन संगणकांपासून सुरू झालेला माझा एमकेसीएलचा प्रवास केंद्र नाव: जिया कॉम्प्युटर एज्युकेशन, सास्तूर (ALC Code: 36210133) ई-मेल: 36210133@mkcl.org लेखक: फारुख उमर केळगावे, सास्तूर, ता. लोहारा, जि. धाराशिव भाग १ : मातीच्या घरातून तंत्रज्ञानाच्या विश्वातील पहिली झेप प्रत्येक यशामागे एक संघर्ष दडलेला असतो. काही प्रवास मोठ्या शहरातून सुरू होतात, तर काही एका छोट्याशा खेड्यातील मातीच्या घरातून. माझा प्रवासही असाच एका साध्या, गरीब पण स्वप्नांनी भरलेल्या कुटुंबातून सुरू झाला. माझे नाव फारुख उमर केळगावे. मी धाराशिव जिल्ह्यातील सास्तूर या १९९३ च्या भीषण भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या गावाचा रहिवासी. आजही हे गाव विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर आहे. मात्र या गावाने मला संघर्ष, जिद्द आणि कष्टाची शिकवण दिली. याच गावातून माझा एमकेसीएलसोबतचा प्रवास सुरू झाला आणि आज जवळपास अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २००७—त्या काळी संगणक म्हणजे गावातील लोकांसाठी एक आश्चर्यच होते. इंटरनेट म्हणजे काय, ई-मेल म्हणजे काय, ऑनलाइन परीक्षा म्हणजे काय, हे अनेकांना माहीत नव्हते. अशा काळात सा...

एम के सि एल ने काही नियम बनवले आहेत ज्यात शहरी सेंटर यांना 120 एम एस सि आय टी प्रवेश व ग्रामीण सेंटर यांना 60 एम एस सि आय टी प्रवेश अट प्रति वर्षी रिनिवल साठी ठेवला आहे.

 एम के सि एल ने काही नियम बनवले आहेत ज्यात शहरी सेंटर यांना 120 एम एस सि आय टी प्रवेश व ग्रामीण सेंटर यांना 60 एम एस सि आय टी प्रवेश अट प्रति वर्षी रिनिवल साठी ठेवला आहे. तसेच कॉमन मार्केटींग करीत शहरी सेंटर व  ग्रामीण सेंटर याना 1500रु. फ़िस ठेवली आहे व रिनीवल करीता 5500रु. शहरी सेंटर व  ग्रामीण सेंटरना आकारणी ठेवली आहे. हा फ़रक का? जर  ग्रामीण सेंटर वाले यांची परिस्थीती पाहिली तर मी स्वत​:चे उदाहरण देतो दुसरे  ग्रामीण सेंटर वाले यांची परिस्थीती मला माहीती नाही, परंतु माझी परिस्थीती पाहणे आधी ग्रामिण भागातील लोकांचे हाल पाहणे फ़ार महत्वाचे आहे. कित्तेक विद्यार्थी त्यांच्या आई वडीलांची आर्थीक परिस्थीती नसले कारणाने एम एस सि आय टी हा कोर्स करतच नाहीत​. एखादा विद्यार्थी प्रवेश घेतो तर तो आर्धी फ़िस भरुन दुसरा हप्ता भरु शकतच नाही व त्याचा अभ्यासक्रम अपुराच राहतो हे अचानक या 5 वर्षात प्रकार का वाढला असावा? याचा आढाव घेणे गरजेचे नाही का? यात सेंटर वाल्यांचे दोष असु शकते का?  2007 पासुन पाहता याच ग्रामीण भागातील सेंटर्स नी रेकॉर्ड ब्रेक प्रवेश नोंदवले आहेत. त्यातील क...

देशासाठी की पैशासाठी?

 मी एका जवाना विचारले खर खर सांग तु मिलट्री मध्ये गेलास ते देशासाठी की पैशासाठी? त्याचे उत्तर हे होते, " पैशासाठी, मास्तर माझी परिस्थीती तुम्हाला माहीत आहे कशी आहे ती, मास्तर आज देश भक्त तुम्हाला भेटणार नाही. मीच सोडा सगळे तिथ पगारीसाठीच आहेत​."

खेड्यागावातील सेंटर वाल्याचे रडगाने आणि त्याचे थेट तंत्रज्ञानाला केलेले खुले चॅलेंज​. तु कितीही पळ रे तंत्रज्ञाना, तु माझ्या मागेच आहेस आणि तु माझ्यासाठीच बनवलं गेला आहेस​.

खेड्यागावातील सेंटर वाल्याचे रडगाने आणि त्याचे थेट तंत्रज्ञानाला केलेले खुले चॅलेंज​. तु कितीही पळ रे तंत्रज्ञाना, तु माझ्या मागेच आहेस आणि तु माझ्यासाठीच बनवलं गेला आहेस​.   सुरुवात कुठून झाली ते सांगतो. 1 प्रोब्लेम साधारणत​: 2017 साली मोक टेस्ट घेतली पण एम के सि एल मोक टेस्ट सक्सेसफ़ुल घेतलेला पाठवला तरी 5 येअर प्लॅन मध्ये अस अडकलो आज पर्यंत कर्जबाझारीच राहिलो. 18 ला भरलो, 19 ला भरलो पण कोरोना मध्ये ते परत मिळाले आणि त्याच कोरोना लॉकडाउन लागण्याच्या साधारण 9 महिने आधी लहान बहिणीचे लग्न झाले, बहिणीचे लग्न होताच 5 ते 6 महिन्यानंतर आईचे ब्रेस्ट कॅन्सरचे ऑपरेशन झाले, लग्न व ऑपरेशनचे खर्च अंदाजीत तुम्ही लावू शकता. मी अस म्हणत नाही की, एम के सि एल मुळे फ़ायदा झाला नाही. त्यातच हळू हळू तंत्रज्ञान शिकत शिकत माझी एका अशा व्यक्तीशी मैत्री झाली जो एक महान शास्त्रज्ञ​, समाज तज्ञ, महान ग्रंथ तज्ञ​, भुत व भविष्यात घडणारे, तंत्रज्ञानाशी जुळणारे काही अशा सत्य बाबीचे जाण असणारी व्यक्तीशी संपर्कात असणारा होता. त्याच्या मार्फ़त मी त्या महाण व्यक्ति पर्यंत पोचलो, त्यांना भेटलो, त्यांचे ऐकुन घेतले की, ख...

ज्या ज्या वेळी पृथ्वीवर लोकांत पाप वाढले त्या त्या वेळी इश्वराने मानव जातीत एक अवतार पाठवतच राहीले

 ज्या ज्या वेळी पृथ्वीवर लोकांत पाप वाढले त्या त्या वेळी इश्वराने मानव जातीत एक अवतार पाठवतच राहीले व एक वेळ आली की अवतार शेवटचा पाठवला व नंतर शेवटच्या दिवसाच्या काही काळ अगोदर एक व्यक्ती जो अगोदर अवतार होता व शेवटी अंतीम अवतार यांच्या सभ्यतेते, अनुयायांमध्ये जन्म घेणार अशी भविष्यवाणी प्रत्येक अवताराने आपापल्या लोकांना सांगुन गेले. आपापल्या पध्दतीने. तर आता मात्र ती वेळ आलेली आहे.  पण प्रत्येक वेळी जनते समोर एक मोठा प्रश्न म्हणुन समुद्रासारखा लोकांच्या वाटेत उभा असायचा व आज तो असाच उभा आहे. पण बोटावर मोजने इतके लोक त्या समुद्ररुपी अडसर, अडचनेला ओलांडू शकले आणि या काळात सुध्दा असेच घडत आहे.  उदाहरण म्हणुन काही गोष्टी समजुन घेवूया.

ज्यांना या सास्तूर गॅस एजंसीचा त्रास आहे त्यांनी हा अर्ज द्यावा एक मेल करावा.

 प्रति, मा. क्षेत्रीय व्यवस्थापक, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड विषय: सास्तूर परिसरात नवीन इंडेन गॅस एजन्सी मंजूर करण्याबाबत. महोदय, सास्तूर, ता. लोहारा, जि. धाराशिव तसेच परिसरातील अनेक गावांतील ग्राहकांना गॅस सेवा मिळविताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून विद्यमान एजन्सीवर कामाचा ताण वाढला आहे. गॅस वितरणात होणारा विलंब, ग्राहकांच्या तक्रारी, रिफंड, बँक खाते लिंकिंग, KYC व इतर कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागणे यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तरी सास्तूर व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी येथे नवीन इंडेन गॅस एजन्सी मंजूर करण्यात यावी. यामुळे ग्राहकांना जलद, पारदर्शक व दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल. सदर मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी ही नम्र विनंती. आपला विश्वासू, (स्वाक्षरी) नागरिक, सास्तूर व परिसर ता. लोहारा, जि. धाराशिव जर तुमच्या परिसरात विद्यमान गॅस एजन्सीकडून ग्राहकांना वारंवार त्रास होत असेल, सेवा अपुरी मिळत असेल किंवा ग्राहकसंख्या जास्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असेल, तर नवीन इंडेन गॅस एजन्सीची मागणी ...