🎓 पैशाशिवाय चांगलं शिक्षण शक्य आहे का?
आज शिक्षण म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतो तो फीचा आकडा.
LKG पासून कॉलेजपर्यंत शिक्षण म्हणजे एक महागडी जबाबदारी बनली आहे.
पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांना सेवा म्हणून शिकवत.
आज मात्र शिक्षण म्हणजे व्यवसाय झाला आहे, हे नाकारता येणार नाही.
ग्रामीण भागातील अनेक हुशार विद्यार्थी
फक्त पैशाअभावी मागे पडतात.
त्यांचे आई-वडील शिकवू इच्छितात,
पण डोनेशन, फी, पुस्तकांचा खर्च त्यांना परवडत नाही.
मग प्रश्न पडतो —
पैशाशिवाय चांगलं शिक्षण शक्य आहे का?
उत्तर सोपं नाही, पण अशक्यही नाही.
आज इंटरनेटमुळे अनेक फ्री शिक्षणाचे स्रोत उपलब्ध आहेत –
ऑनलाइन व्हिडिओ, डिजिटल क्लासेस, मोफत अभ्यासक्रम.
फक्त योग्य मार्गदर्शन आणि इच्छाशक्ती हवी.
सरकार, शिक्षक आणि समाज
जर एकत्र आले
तर प्रत्येक गरीब मुलालाही
चांगलं शिक्षण मिळू शकतं.
शिक्षण हा हक्क आहे,
फक्त श्रीमंतांचा अधिकार नाही.
✍️ – Farukh Kelgave
Comments
Post a Comment