🎭 शाळांमध्ये शिक्षण कमी, सण-दिवसांचा देखावा जास्त
आज शाळांमध्ये
शिकवणं होत नाही,
साजरा होतो.
आज अमुक दिन,
उद्या तमुक दिन,
परवा कुणाचा जन्मदिन,
मग कुठला तरी सप्ताह.
दर आठवड्याला
एक नवा बोर्ड,
एक नवा बॅनर,
एक नवा कार्यक्रम.
📸 फोटो काढले जातात,
🤳 सेल्फी होतात,
📤 सोशल मीडियावर अपलोड होतात.
मग म्हणतात —
“आमची शाळा खूप अॅक्टिव्ह आहे.”
🧾 Inspection साठी शिक्षण
निरीक्षण (Inspection) आला की —
-
वर्ग सजतो
-
वही तपासली जाते
-
फाईल पूर्ण होते
निरीक्षक गेला की —
शिक्षण पुन्हा
फाईलमध्ये बंद.
मुलं मात्र —
-
वाचनात मागे
-
लेखनात कमकुवत
-
विचारात गोंधळलेली
पण फोटो मात्र
परफेक्ट.
📚 अभ्यास कुठे हरवला?
दिवस साजरे करताना —
-
वाचन हरवलं
-
लेखन हरवलं
-
मूलभूत शिक्षण हरवलं
पण —
“कार्यक्रम यशस्वी झाला”
असा रिपोर्ट तयार.
शिक्षण म्हणजे —
कार्यक्रम नव्हे,
तो रोजचा संघर्ष असतो.
❓ प्रश्न विचारणारा कोण?
मुलं आज —
दिन कोणता हे सांगू शकतात,
पण —
एक पान नीट वाचू शकत नाहीत.
भाषण पाठ करतात,
पण विचार करत नाहीत.
कारण —
शाळा आता
शिकवण्याचं ठिकाण न राहता
दाखवण्याचं ठिकाण झाली आहे.
✍️ कडू पण सत्य
शाळांमध्ये —
दिन साजरे झाले,
आठवडे साजरे झाले,
वर्ष साजरे झाले.
पण —
विद्यार्थी घडले का?
हा प्रश्न
कोणालाच विचारायचा नाही.
कारण —
फोटो छान आले आहेत.
सेल्फी मस्त आहेत.
आणि दिखावा चालू आहे.
✍️ – Farukh Kelgave

Comments
Post a Comment